Friday, 3 May 2019

पूर्वग्रह दूषित मी...

                            


          आज महाविद्यालयाच्या एका वर्गात सुपरविझन करत होते, पेपर सुरू होणार तोच एक मुलगा वर्गात आला. त्याने टोपी उलटी घातली होती, एका कानात बाळी होती, डावी भुवई संपते तिथे टोचलेले होते, गळ्यावर  टॅटू होता, टी शर्ट आणि फाटलेली जीन्स घातलेला, हा ऊंच पण बारीक अंगकाठीचा मुलगा, एखादा रॅप सिंगर यावा तसा येऊन बाकावर बसला. त्याला पाहताच माझ्या मनात विचारांची शाळा भरली. एकंदरीत मला असेच वाटले की हा आता स्वतः पेपर लिहीणार नाही आणि दुसऱ्यालाही लिहु देणार नाही. मनात असुरक्षिततेची भावना वाढली आणि मी पहारेकरी सारखे त्याच्या जवळ जाऊन ऊभी राहिले. त्या मुलाने मात्र पेपर लिहीण्यासाठी मान जी खाली केली ती थेट शेवटी मला पेपर देताना वर केली. मी त्याच्या पेपरवर सही केली तेव्हा तो एकमेव मुलगा होता जो आदराने ऊभा राहिला होता. ह्या उलट वर्गाच्या दुसऱ्या कोपऱ्यात, चषमा लावलेला एक मुलगा होता, त्याने कपाळ्याच्या मधोमध भस्म लावला होता, चेक्सचा साधा शर्ट आणि सज्जन भासणारी त्याची चेहरे पट्टी होती. ह्या मुलाला मात्र मी २-३दा कॉपी करताना पकडले.
         दिवसभराच्या माझ्या वागणुकीचे सिंहावलोकन  करण्याची सवय जर मला नसती तर माझा अंदाज चुकला हे माझ्या लक्षात आले नसते. प्रामाणिकपणा मनात असतो, संस्कारात असतो, म्हणुन तो वागणुकीत  झळकतो, वेशभूषेत नाही.
          प्रसंग हा तसा किरकोळ आहे पण मी शिकले!
स्वाती

16 comments:

  1. 👍👍vry true ...and inspirable

    ReplyDelete
  2. Nice👌😊👍👍

    ReplyDelete
  3. स्वाती तू खूप छान लिहू शकते

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्यू

      Delete
    2. दिसत तसे नसते जसे आमचं घर

      Delete
  4. Yes, true introspection. Society always fails to identify true faces due to sham social transcriptions

    ReplyDelete
  5. Judge people not by cover 😊

    ReplyDelete