मी जेंव्हा शाळेत होते तेंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी नेहमी माझ्या मामाच्या गावी, नाशिक जिल्ह्यातील नांदगावला जात असे. माझ्या सर्व बहीण भावांसोबत लहानपणी मी एका शुक्रवारी देवी मंदिरात गेले होते. मी मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश केला मंदिर भाविकांनी खचाखच भरलेले होते. गर्दीने मला आपसूकच आत ढकलले, मी हळूहळू मुख्य गाभार्यात पोहोचले, आणि जेव्हा आम्ही आत होतो तेव्हा माझा जीव गुदमरला. ती एक अस्वस्थ आणि तीव्र भावना होती, कधी एकदा मी इथून बाहेर पडते आणि मोकळ्या हवेत श्वास घेते असे मला झाले होते. मोकळ्या हवेत बाहेर आले तेव्हा बरे वाटले. या घटनेची कितीतरी वेळा पुनरावृत्ती झाली, कधी मंदिरात, कधी सार्वजनिक बसमध्ये, कधी ऑटोरिक्षात, कधी गजबजलेल्या ठिकाणी, मॉलमध्ये, विमानात, या सर्व ठिकाणी गर्दी हा नेहमीचाच घटक होता, जिथे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण जास्त असते. त्यात योगदान देणारा घटक म्हणजे तापमान, जसे की हिवाळा असो किंवा मुसळधार पाऊस, जीव गुदमरणे ही समस्या तेवढी नव्हती पण उन्हाळा असेल आणि गर्दीचे ठिकाण असेल तर अनेकदा मला श्वासोच्छवासाचा त्रास होतो. अशा अनेक घटनांमुळे मला समजले की मी *क्लॉस्ट्रोफोबिक* आहे. क्लॉस्ट्रोफोबिया ही एक मर्यादित जागा किंवा गर्दीच्या ठिकाणी वाटणारी भीती किंवा अस्वस्थ करणारी स्थिती आहे. घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, जास्त गरम होणे, घाबरणे, थरथर कापणे आणि नंतरच्या स्थितीत बेशुद्ध होण्याची शक्यता असते.
क्लॉस्ट्रोफोबिया संबंधित लक्षणे नियंत्रित करण्याचे काही मार्ग आहेत,
1. दीर्घ श्वास घेणे आणि भस्त्रिका प्राणायाम.
2. कापडात गुंडाळलेल्या कापूर क्रिस्टल्सचा वास घेणे.
3. स्कार्फ, ओव्हरकोट, मोजे, शूज इत्यादींसारखे जास्तीचे कपडे काढून टाकणे.
4. तुमच्या पायांना मोकळा श्वास घेऊ द्या, मोजे काढा.
5. अश्या घटने दरम्यान तुम्हाला अधिक स्वारस्य असलेल्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष वळवणे.
6. विशेषत: तापलेल्या हवामानात शरीराला फारसे फिट नसलेले पातळ, सुती आतील कपडे घालणे.
7. क्लॉस्ट्रोफोबिया नियंत्रणापलीकडे जाऊन दैनंदिन कामात अडथळा ठरत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे.
नियमित जीवनात खालील गोष्टींचा सराव करता येतो.
a) खोलीच्या आत - दरवाज्या जवळ थांबणे, पंखा किंवा एसीच्या जवळ उभे रहा.
b) वाहनाच्या आत - जेव्हा वाहतूक जास्त असेल तेव्हा प्रवास करणे टाळा, दुपारच्या वेळी तापमान जास्त असेल तेव्हा, खिडकीजवळ बसणे किंवा एसी जवळ बसणे.
c) इमारतीच्या आत - लिफ्टपेक्षा पायऱ्या चढणे पसंत करा.
d) पार्टीत - गर्दीच्या खोलीत दाराजवळ उभे राहणे, खोली मोठी असली तरीही.
e) शारीरिकदृष्ट्या नेहमी निर्गमन बिंदूजवळ असणे.
f) जड/अति जेवण टाळणे आणि हायड्रेटेड राहणे- भरपूर पाणी पीत राहणे.
आणि सर्वात महत्त्वाचे मनाला स्थिर आणि प्रसन्न ठेवणे.😇
Nice information 👌
ReplyDeleteThank you
Delete