Thursday, 26 February 2026

दव




एका साहित्यकाच्या घरात जन्माला येणे म्हणजे भरून आलेले आभाळ आणि त्याला प्रकाशाची किनार…

सतत श्रावण मास असल्याचा भास किंवा वसंत ऋतू च्या आगमाची आस. 

कवी कल्पनाशक्तीच्या शिखरावर असताना, किराण्याची यादी हातात मिळावी तसे घरातील ऋतू रंग बदलत असत.

व्यवहारी जग आणि आतील कवी मनाची तडजोड मला काही नवीन नव्हती. अशा सुखद भावनात्मक संघर्षाच्या वातावरणात मला गणित कोण शिकवणार? यावर गंभीरपणे विचार सुरू असतानाच, वडिलांचे साहित्यिक मित्र मंडळी घरी येत असे आणि ‘आपले गणित चुकले’ हे मला त्या वयात ही कळावे, कांद्याची भजी , फक्कड चहा आणि कोट्यात्मक विनोदाच्या लाटा…कुठले गणित आणि कोणती किराणा यादी? सगळं वाहून जायी.

मला ही अभ्यासाचा जास्त पुळका नव्हता. त्यामुळे वडिलांचे बोट धरून मी ही निघायचे. कधी गंगेवर, कधी सार्वजनिक वाचनालय, कधी वसंत व्याख्यानमाला, कधी काळाराम, कधी गोंदेश्वर, तर कधी कविवर्य तात्यासाहेबांच्या घरी. 

काकासाहेब वि. वा. शिरवाडकर, त्यांच्या नाशिकच्या घरी तसे एकटेच रहात असत. मोठ्या मनाच्या या विभूतीच्या घरातील खोल्या तशा लहान होत्या आणि अंगणात मी खेळत असे. आजही मला त्यांची खुर्ची, टेबल, बुक रॅक आणि त्यांचा पलंग आठवतो. बाकी सगळं पुसट आठवतय. 

अशाच एका भेटीत मी ‘ध्यास’ कवितेवर कुसुमाग्रजांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

सर्वांचे लाडके तात्यासाहेब आठवणींची शिदोरी देऊन पलीकडच्या प्रवासावर निघून गेले.

काही वर्षांनंतर मी त्यांना आमच्या कॉलेजच्या “कुसुमाग्रज “ हॉल बाहेर लावलेल्या एका फोटोत पाहिले, आणि मला लहानपणचे ते शांत निवांत क्षण आठवले, वृक्षाच्या पानावरील दव अनुभवावा तसे स्मरण झाले. मोठी माणसे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्य जगायची व लढायची ऊर्जा देऊन जातात. 

साहित्य महर्षी विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब आज त्यांच्या जयंती निमित्ताने “मराठी भाषा गौरव दिन व विश्व मराठी साहित्य संमेलनानिमित्त” प्रकर्षाने आठवले. त्यांचा सहवास व आशीर्वाद लाभले हे भाग्य नसे थोडके.

“आमुच्या कुला कुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी”

बोलतो मराठी… जाणतो मराठी…मानतो मराठी









Monday, 23 February 2026

Closed, unfinished or trapped?

 The geometry of our inner narratives!




Very small patches come together to solve the jigsaw of life. Our experiences too can be symbolically understood in simple forms in the diagram given above.

A half circle signifies a thought left midway, unimplemented, lacking foundation, an effort made with no closure. Such half-formed attempts consume energy and mental space. They must be identified, learned from, and consciously discarded, not repeated unconsciously and one should quickly move forward.

An incomplete or unprocessed circle represents something different. You tried your best. You reached far. You were almost at the finishing line, ready to taste the fruit but circumstances, limitations, or resilience fatigue stopped you. The effort remains suspended. You are left astonished, confused, and slightly unsettled. These are unprocessed tasks, incomplete emotional files, unfinished conversations. You can pause for a little-while, if necessary, but sooner have to let it go, signing off.

A complete circle signifies the art of finishing. It reflects closure, the discipline of concluding, detaching, and freeing mental space to initiate something new. A completed circle is a file consciously closed and placed into the mental shelf.

Then comes the circle with an arrow which is the vicious loop. Here, you are not simply unfinished; you are trapped. It is a repetitive pattern of thought or experience. You wish to detach, yet you unknowingly return to it. Unlike an incomplete circle that allows you to leave it, restart a new one, a vicious loop keeps you rotating in the same emotional orbit. It drains awareness and subtly creates dependency. It’s vital to break this pattern.

Pause and reflect.

What kind of circles you currently are dealing in your life?

Is it halfway? Or Unprocessed? Or  A vicious loop?

Or completed circle which is identified, sorted, treated, and concluded?

If necessary, pen it down, sort them as per types of patterns in the diagram, decide the line of action, start implementing with awareness and feel the results. 

Our journey becomes lighter when we recognise the shape of our experiences.

Sunday, 21 September 2025

The Barfi Moments!

   


     In our day-to-day hurry-worry life, we often miss the smallest emotional taps,  the “barfi moments” These spur-of-the-moment joys are light, they melt quickly, but their sweetness lingers, just like the taste of a small square of barfi. 

A barfi moment could be as simple as exchanging a glance and a smile at work, acknowledging each other’s presence, or sharing food that a colleague loves. It could be expressing a thoughtful view over tea, noticing the stress lines on someone’s face, or recognising the quiet weight of a low mood. It might be understanding that rules can always be remade, but the fragile state of the mind needs gentle care. Sometimes it is nothing more than a kind word, a compliment, or a line of credit for work done well.

The smaller the gesture, the lighter the mode, and the sweeter the barfi. Often underestimated and dismissed as empty highs, these little sparks are in fact what soothe us, just like a spray of joy across the day. Aren’t they like small, colorful butterflies fluttering around us on a sunny day with a clear sky above?

They actually make up our days. And isn’t life, after all, about the present moment we live? These barfi moments aren’t sold anywhere. They ask only for a little extra mindfulness  to notice, to tap, and to breathe them in.

Sunday, 6 July 2025

माझी सांगाती


आज आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मी लवकर उठून स्नान आणि योगा केला. अंगणात सडा टाकून कोल्हम रांगोळी काढली. देवपूजा करून आम्ही फराळ बनवले. आईने माझ्या आवडीचा खुसखुशीत फराळी चिवडा घरीच बनवला होता. तो चिवडा खात असताना मला आईबद्दल काय वाटतं, हे आज मी तिला सांगितलं. माझी आई म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून तिचा स्वभाव प्रेमात पडावा असाच आहे. दुसऱ्याचा विचार करणारी, त्यांचं म्हणणं शांतपणे आणि एकचित्ताने ऐकून घेऊन मग योग्य तोच सल्ला देणारी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारी, आणि बोलायचंच असेल तर फार विचारपूर्वक शब्दांची निवड करणारी. दुसऱ्याची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव टिपून पुढील संवाद-सूत्र ठरवणारी. एखादा जर फार नकारात्मक दृष्टिकोन घेऊन आला असेल, तर आई त्याला सकारात्मक बाजू दाखवत असे. आईचं म्हणणं किंवा निष्कर्ष कधीच दुसऱ्यांच्या म्हणण्यावर अवलंबून नसते. तिचं विश्लेषणात्मक कौशल्य, म्हणजेच माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता, जबरदस्त आहे. त्यात संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञानाची अचूक जोड तिला लाभली आहे. हे विश्लेषणात्मक कौशल्य आईला व्यवहारात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात, आर्थिक, सामाजिक आणि इतर अनेक बाबतीत मदतीचं ठरतं. आईचं हे कौशल्य इतकं विकसित होण्यामागे लहानपणापासूनची वाचनाची आवड, तारुण्यात घरातील व्यवसायाचे अकाउंट्स सांभाळण्याची मिळालेली संधी आणि नोकरीतील क्वालिटी व ऑडिटचा बक्कळ अनुभव हे सर्व कारणीभूत आहेत. आयुष्यात आलेल्या अडचणी आणि काही कटू अनुभवांमुळे तिच्यात दूरदृष्टी आणि तार्किक विचारपद्धती रूजली गेली आहे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून तिचा सर्वांगीण विकास उत्कृष्टरीत्या झालेला आहे. याची मला जाणीव आहे आणि त्याचा अभिमानही वाटतो. जसे आपण आपल्या सहकाऱ्यांची आणि वरिष्ठांची कधीतरी प्रशंसा करतो, स्तुती करतो, कधी एखाद्या कार्यासाठी मदत व्हावी म्हणून विनंती करतो आणि गरज पडल्यास, काही चुकल्यास माफीही मागतो, तशीच प्रशंसा आपण आपल्या आई-वडिलांची, जोडीदारांची किंवा मुलांचीही कधी करून पहावी. ते आनंदी तर होतीलच, पण त्यांना पुढील आयुष्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल. आज मी मनातलं आईला सांगितल्यानंतर ती स्मितहसली. काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांत, हावभावांत तिला झालेला आनंद आणि समाधान मला दिसलं आणि ते मौल्यवान वाटलं. आई जास्त बोलत नाही, पण तिच्या कृतीतून शिकायला तर नक्कीच मिळतं… आणि आधारही मिळतो. म्हणूनच आज वारकऱ्यांना पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळाल्यावर जो विलक्षण आनंद होईल तशीच काहीशी अनुभूती मला मिळाली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया,
चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा,
बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलों देवा,
तुका म्हणे आता खेळतो कौतूकेजालें तुझे सुख अंतर्बाही ।।

जय हरी विठ्ठल!

विठू माऊली… माऊली विठू ।।

Sunday, 15 June 2025

Braids and Bread Rolls

                        My kaleidoscope!



My childhood was a kaleidoscope, and you were at the heart of every color and pattern.

From home to school and back home again, every moment was spent with you. You were not just my father, you were my teacher, my playmate, and my guide. We shared not just a house, but a classroom, a stage, and a life.

I still remember our little mimicry sessions, where we’d imitate relatives and burst into laughter. Your presence would light up every family gathering. The poems you wrote, the plays you directed, we, Aai and I, were always the first ones to watch, to smile, and to clap.

You never quite perfected it, but every morning you’d patiently braid my hair into plaits before school. That was love, steady, and full of effort. 

Our vacations were always together because we belonged to the same school, you as a teacher, I as your student. It was a bond few get to experience. The classroom never really ended, because the lessons continued at home, in the form of stories, values, and wisdom.

You invented so many indoor games, back in a time when there was no YouTube, no online tutorials, not even Google. I especially remember the matchbox game, you’d flip it and the goal was to make it land standing upright. It was simple, creative, and so much fun. You taught me chess too, not just the moves, but the strategy, the patience, and the power of thinking ahead.

And yes, it was you who lifted me up every single day so the wound I had from that accident could be cleaned and dressed. You stood beside me, hand in hand, every time the bandage was changed.

You introduced me to Marathi dramas, poetry recitations, films, and garden strolls. You wrote my speeches and prepared me for elocution contests.  Then on the final day, you would lovingly accept my wish of you not attending it because I felt too conscious. That was your quiet strength, very supportive without conditions.

You taught me how to manage money, how to deal with banks, and how to handle life. Our Maggi and bread roll sandwich parties, just you and me when Aai was at work, were tiny, fulfilled celebrations. The taste still lingers on my tongue.

Our evening walks weren’t just about exercise. They were about sharing stories, talking about life, and learning values I didn’t even realize I was absorbing.

I can’t remember a single conversation with you that didn’t leave a mark. You had this rare ability, either to make people laugh till their stomachs hurt or to say something so simple and heartfelt that it settled straight into the heart.

That last night, in the final hours before you left us forever, when I was sleeping near your bed, head resting close to you, you gently patted my head. That soft touch said it all: “I am here. I’ll always be here. Take care of yourself. And remember, your mother is an incredible and extraordinary woman.”

And so, you remain,

In every braid I make,

In every sandwich I toast,

In every poem I write,

In every truth I live.

And trust me the ‘the last pat remained’ in the form of a daughter’s memories of love, learning, and letting go.



Tuesday, 10 June 2025

मिशन टिकली



 ‘टिकली’ तर टिकली, ती ही टिकली! 

साधारण ३० वर्षांपूर्वीची ही गोष्टं आहे, माझ्या आयुष्यात जे घडले ते आज तुमच्या बरोबर शेयर करते. मी ज्या शाळेत होते ती एक ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे, अत्यंत प्रतिष्ठित, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण तेव्हा देत असे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नं करत असे. तेव्हा फारशा शाळा नव्हत्याच मुळात, ही घराजवळ होती आणि माझे वडील ही ह्याच शाळेत मराठी भाषेचे शिक्षक होते, त्यामुळे सोयीची होती. पण शाळेतील काही नियम, देशाबाहेरील मिशनरी संस्थांकडून आलेले असावेत कदाचित, तदापी ते स्वीकारणे जरा आम्हाला कठीण जात असे. त्यापैकी एक नियम म्हणजे मुलींना कपाळावर टिकली लावण्यास मनाई! तशी ही शाळा सर्व धर्मांच्या आणि जातींच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती, त्यामुळे हा नियम विद्यार्थी आणि काही शिक्षकांना मान्य नव्हता. इतर काही मुली आणि मी एकत्र आलो, आम्हाला काही शिक्षकांचा पाठिंबा होताच, आणि एकत्रितपणे आम्ही या नियमाविरुद्ध तटस्थ उभं राहिलो. बंदी असूनही आम्ही कपाळावर रोज टिकली लावली, काहींनी गोलाकारात गंध लावला, अगदी निर्भयपणे. असे बरेच आठवडे गेलेत. मी तेव्हा लहान होते, त्यामुळे वरच्या एडमिनिस्ट्रेशन मधे नक्की काय घडलं ते अर्थातच मला काही उमगले नाही, किंबहुना चर्चा झाल्या असाव्यात, आणि अखेरीस ह्या नियमाचा फडशा पाडण्यात आला. त्यानंतरच्या काळात मात्र आम्हाला पुन्हा टिकली लावण्यास कोणीही मज्जाव केला नाही.

मी टिकलीला जशी चिकटले तशीच टिकलीही माझ्यावर टिकून राहिली. माझ्या आयुषात संकल्परूपी टिकली प्रतीकात्मक ठरली, असा संकल्प जो योग्य आहे आणि जो कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास न्यायाचा.

मी दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले, तेव्हा शाळा सुटली आणि पुढे मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेजमध्ये विज्ञान शाखा निवडली. माझ्या शाळेतील बहुतेक मैत्रिणींनी कॉमर्स घेतलं होतं, त्यामुळे मी येथे एकटी पडले होते, एका वेगळ्याच वाटेवर. बारावी जेमतेम पास झाले आणि पुढे मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्याच आरवायके सायन्स कॉलेज मधे बॅचलर ऑफ सायन्स च्या डिग्री साठी प्रवेश घेतला. कालांतराने मला मायक्रोबायोलॉजी विषय खूपच आवडू लागला, श्रेय अर्थात त्या काळातील शिक्षकांनाच आणि वाचनालयातील पुस्तकांना जाते. पदवी घेत असतानाच्या शेवटच्या वर्षी माझ्या वडिलांना एक असाध्य आजार झाला. त्याच काळात पुणे विद्यापीठात मायक्रोबायोलॉजी विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी पहिल्याच गुणवत्ता यादीत माझे नाव झळकले. मात्र घरच्यांचे म्हणणे होते की मी 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत पुढील शिक्षण घ्यावे. माझ्या कुटुंबाचे आर्थिक गणित वडिलांच्या उपचारां भोवती फिरत असल्याकारणाने विस्कळीत झाले होते, त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणं तेव्हा आव्हानात्मक होतं. ठरल्यानुसार, मी विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' योजनेत नाव नोंदवलं. मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी च्या पहिल्या वर्षी मी परदेशी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र विभागात सहाय्यक म्हणून काम केलं. दुसऱ्या वर्षी मुलींच्या मेसमध्ये टोकन वाटपाचं काम केलं. मला तासाला १५ रुपये मिळत असे. या पैशात दोन वेळचं जेवण एडजस्ट झाले, पण नाश्ता एडजस्ट होऊ शकला नाही. रविवारी मेसमध्ये फीस्ट असल्याकारणाने रात्रीचं जेवण नसायचं, तेव्हा मी एक तर ५ रुपयांचा वडापाव किवा पार्ले बिस्किट खायची किंवा कधी कधी उपाशीच झोपत असे. मित्र-मैत्रिणींनो, मी काही UPSC किंवा MPSC ची तयारी करत नव्हते, म्हणून माझ्या आयुष्यातील या संघर्षांविषयी पुस्तक लिहिण्याचं कधीच मनात आलं नव्हतं. पण हाच संघर्ष पुढे Ph.D.च्या दरम्यानही सुरूच राहिला. डॉक्टर ऑफ फिलोसोफी साठी मी माझा आवडीचाच विषय निवडला, पण त्याला कुठला निधी किवा आर्थिक पाठबळ नव्हते आणि पितृछत्र हरपले होते त्यामुळे परिस्थितीच्या झळांचा सामना करावा लागला. म्हणूनच मी, मांजरी-हडपसरमधील एका नामांकित कॉलेज मधे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलं आणि Ph.D. पूर्ण केली. पीएचडी मधील माझ्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी भारत सरकारच्या IAMM ने मला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. आर्थिक कोंडी होतीच त्यामुळे मी लागलीच गोखले एजुकेशन सोसाइटीच्या कॉलेज मधे प्राध्यापिकेची भूमिका स्वीकारली आणि तेव्हापासून आजही वर्गातील माझ्या प्रत्येक तासाचे मी सिंहावलोकन करतेच व स्वतःत सुधारणाही घडून आणते. हीच निष्ठा आणि ह्या प्रामाणिकपणामुळे कोविड च्या काळात मी आणि माझ्या टीम ने एक लाख ४० हजार रुग्णांचे सैंपलच्या चाचण्या बिनचूक करून दिल्यात. २४ तासात रिपोर्टिंग झाल्याकारणाने, रुग्णांवर उपचारही पटकन होऊ शकले, अनेकांचे प्राण वाचलेत. मार्ग तसा अवघड होता पण त्यात अचूकता होती, “because harder right was always preferred over easier wrong”.

तरीही, आजूबाजूचे अनेक लोकं सहज आणि चुकीचे मार्ग निवडून आयुष्यात स्थिर आणि ‘यशस्वी’ झालेले मी पाहिलं, आजही पाहते आहे. पण या सगळ्या अनुभवांमधून मी एक महत्त्वाचा धडा घेतला- सहज-सोपं आयुष्य कुणालाही मिळू शकतं, पण अर्थपूर्ण आयुष्य धाडसातून उभं राहतं. मी जे निवडलं ते सोपं नव्हतं, पण ते मूल्याधिष्ठित होतं, स्वाभिमानाने भरलेलं होतं, आणि खऱ्या अर्थाने ते "माझं" होतं. यातून बरच शिकायला मिळाले, जे आता मला शिकवताना ही कामी येतय. 

कठीण वाट निवडल्यामुळे आयुष्यही सतत संघर्षांच्या आणि कठीण प्रसंगांच्या लाटांवर हेलकावे खात राहणार, हेही तितकेच खरे! कपाळावरच्या टिकलीचा संघर्षाचा प्रवास काही संपला नाही, न झुकता माझ्याबरोबर ती ही ठामपणे उभी आहे, माझ्या अस्थित्वेची जाणीव करून देणारी ती सहचर आहे.

Monday, 9 June 2025

Selfie to Soulfie




A Cultural Shift in Self-Portrayal

It’s been more than two decades since the word selfie was coined, originating in Australia and in 2013, it was announced as the “Word of the Year” by the Oxford English Dictionary. Around the same time, selfie culture and solo travelling began rising in popularity, often going hand in hand. The smartphone industry quickly caught on, with front-facing camera technology advancing rapidly to meet the new demand. Suddenly, users were more interested in the clarity of the front camera than the back, marking a significant shift in user preferences.

Smartphone brands like Oppo gained immense popularity, particularly among women, for their selfie-optimized features. Samsung, OnePlus, and later, Nothing, co-evolved to cater to this camera-centric demand. As the tourism industry flourished, so did the race to build phones with high-quality cameras. As camera technology progressed, so did the way people shared their lives. People no longer just traveled, they documented their experiences, initially through platforms like Orkut and Facebook, where photos were shared as posts. Later, these moments found more dynamic expression through Instagram stories and, eventually, reels.

This transformation wasn’t just technological, it was psychological and cultural. Social media turned everyday users into the protagonists of their own narratives. Ordinary moments were dramatized and shared, often mimicking a celebrity lifestyle. Many did, in fact, gain fame through these platforms, especially those with the creativity and talent to capture attention in the form of likes and views.

The selfie era marked a shift from interpersonal interaction to self-presentation. For some, selfies became a tool for building confidence and self progress. For others, the pursuit turned obsessive, and in extreme cases, bordered on narcissism. As the trend matured, it diversified: mirror selfies, gym selfies, couple selfies, pet selfies, food selfies, content selfies, the list kept growing.

This hyper-focus on external appearance, on curating the perfect portrait for the world, gradually started taking its toll. With so much energy directed outward, there was little left for inward reflection. The soul, in majority cases, was left out of the frame.

As with any cultural wave, saturation eventually sets in. And now, the selfie seems to be giving way to a deeper, more meaningful alternative: the soulfie. Unlike the selfie, which fixates on how we look, the soulfie invites us to explore and express how we feel and who we truly are beneath the surface. It’s less about framing the face and more about revealing the soul.

Each one has a self so probably expressing oneself isn’t unnatural. Perhaps, the shift from selfie to soulfie marks the beginning of a more conscious, mindful era of self-expression, where how we see ourselves finally matters more than how we are seen. A soulfie is not just a photograph, but a pause, a moment to turn inward through practices like meditation, journaling, blogging or simply being present with oneself. It’s an invitation to reflect, to reconnect with one’s inner world, and to express not just the face, but the feeling. In this evolving culture, the soulfie becomes a mirror to the soul, quiet, authentic, and deeply human.