Sunday, 17 April 2022

आजी, पापड आणि बरंच काही!

 


उन्हाळी सुटी घर आवरण्यात आणि धान्य भरून ठेवण्यात पटकन निघुन जात असे. धान्य स्वच्छ निवडून आणि ऊन दाखवुन आम्ही कोठीत वर्षभरासाठी भरून ठेवत असे. उन्हाळी वाळवण मध्ये नागलीचे, उडीदचे पापड, मसाला, तिखट, कुरडई, शेवया, साबुदाणा चकल्या आम्ही करीत असो. मी काही एक्स्पर्ट वगैरे नाही पण आईला थोडी फार मदत करीत असे. मदतीच्या नावाखाली बरेच पापड मी वाळवायला नेते सांगुन रस्त्यात फस्त करीत असे. पापडाच्या सेक्टर मध्ये माझ्या आयुष्यात यू टर्न भुसावळच्या शूरजोशी आजींना भेटल्यानंतर आला. मी खऱ्या अर्थाने सिरियस आजीमुळे झाले.  मुळात माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. आजी रोज मला नव्याने तेच  ईंट्रोडक्टरी लेक्चर देत असे.  विषय होता उपवासाचे पापड. त्यांची सून स्वयंपाकाला लागली कि आजी आमच्याकडे येऊन दमदार आवाजात मला पापड रेसीपी सांगत असे आणि तु  करच असा आग्रहही धरत असे. मी सुरवातीला हो म्हणुन टाळले आणि मला पण वाटले विषय संपला पण एके दिवशी भल्या सकाळी आजीने मला एक किलो बटाटे घ्यायला बाजारात पाठवले. मी परत येऊ पर्यंत त्या दरवाज्यात बसल्या होत्या तेव्हा तिथे मला पळण्याचा स्कोप नव्हता. मी निमुटपणे बटाटे घेऊन आले आणि मग मला ते उकडायला लावले. साल काढुन मला बटाटे उलट्या दिशेने किसायला लावले, असे केल्याने किसणीला बटाटा चिकटत नाही. मी त्यात योग्य प्रमाणात (आजींच्या सांगण्या नुसार) साबुदाणा पीठ आणि चवी पुरते मीठ घातले. आजींने मला ते गरम असतानाच, एक जीव होऊ पर्यंत मळायला लावले. आजींच्या उंच स्वरामुळे एव्हाना बिल्डिंग मधल्या ऑलमोस्ट सर्व लोकांना कळले होते की मी पापड किंबहुना उपवासाचे पापड करीत होते ते. कहाणी मध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पिवळे तिखट ही कन्सेप्ट आजी कडुन कळली. भुसावळच्या पिवळी मिरची पासुन केलेले हे पिवळे तिखट असे. हे तिखट आजीचा ट्रेडमार्क होता! मार्केट वॅल्युव तशी आजी  वॅल्युव म्हणता येईल. घरातील तिजोरीतून अर्धा ग्रॅम सोने द्यावे  तसेच काही आजींनी त्यांच्या थैलीतुन मला थोडे पिवळे तिखट दिले. माझ्या कामावर नाखूष असल्या कारणाने नंतर ते पीठ मला आजीने मळून दिले आणि  प्लास्टिक पेपर वर अंगठ्याने पापड कसे पसरवायचे  हे ही शिकवले. पापडाचे मशीन वापरल्याने चव बिघडते असे त्यांनी मला दरडावून सांगितले. पापड दोन तासात वाळले आणि लागलीच मी ते तळले देखील. सूर्यास्ताच्या वेळी नदी जशी शांत निवांत वाटते, तसेच पापड दिल्यानंतर आजी गालातल्या गालात गोड हसल्यात. मित्रहो आता असे झाले आहे कि इतर उन्हाळी कामे होतील किवा नाही होणार मात्र आजींनी शिकवलेले उपवासाचे पापड मी नक्की करते.  मिस यू आजी ❤

आजींना डेडिकेट केलेली रेसिपी सर्वांसाठी खाली पोस्ट करत आहे

https://m.youtube.com/watch?v=BiAtfmv-ca4


2 comments: