आपली टाच का दुखते?
बहुतेक वेळा टाचांमध्ये वेदना हे प्लांटर फॅसिआ हा जाड टिश्यू दुखल्यामुळे होते.
प्लांटर फॅसिआ मध्ये पायाला आधार देणाऱ्या संयोजी ऊतींची जळजळ, ज्यामुळे सूज आणि वेदना होतात. फॅसिआ टाचेच्या हाडांना पायाच्या बोटाशी जोडतो.प्लांटर फॅसियावर येणाऱ्या सुजेला प्लांटर फॅसायटीस म्हणतात.
यात सूक्ष्म टेअर, कोलेजन तुटणे आणि जखम होणे यांचा समावेश होतो. यामुळे कधी कधी या वेदनांना जळणाऱ्या संवेदना समजले जाऊ शकते. वेदना तीव्र किंवा सुस्त असू शकतात. सामान्यतः, सकाळी पायांवर उभे राहिल्यानंतर वेदना अनुभवली जाते.
या वेदना कशामुळे होतात?
- दीर्घकाळ उभे राहून काम केल्यामुळे,
- धावल्यामुळे,
- व्यायामाचा अतिरेक केल्यामुळे,
- शरीराचे वजन वाढल्यामुळे,
- दोन्ही पायांची लांबीत असमानता असल्या कारणाने,
- आतल्या बाजूने वळण्याच्या प्रवृत्तीसह असलेले सपाट पायांमुळे,
- टाच स्पर झाल्यामुळे (कॅल्शियम जमा होणे)
टाचेचे दुखणे कसे कमी करावे?
कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि शस्त्रक्रिया टाळायची असल्यास, प्राथमिक स्तरावर स्वत: ची काळजी कशी घ्यावी?
- आरामदायक फुटवेअर घालणे,
- मधूनमधून विश्रांती घेणे,
- टाचेवर बर्फ लावणे,
- वजन कमी करणे,
- फूट-रोटेशन आणि तळपायाचे स्ट्रेचिंग चे व्यायाम करणे.
One more reason which is very common is increased Uric acid for pain in heel.
ReplyDeleteWhen uric acid is the reason it is called gout. Gout and plantar fasciitis are two distinct foot conditions.
Delete