Monday, 5 June 2023

भारतीय शौचालय: 'स्क्वैट टॉयलेट'


 भारतीय प्रसाधनगृहांना जागतिक स्तरावर *स्क्वॅट टॉयलेट सीट* म्हणून संबोधले जाते कारण वापरकर्त्याला नियमितपणे नकळत स्क्वॅटिंगचा व्यायाम होतो. शौच करण्याच्या भारतीय स्थितीमुळे शरीरातील खालच्या भागात रक्ताभिसरण वाढते आणि पोटात अतिरिक्त दाब निर्माण होऊन अन्नाचे छान मंथन होते.

स्क्वॅटिंग पोझिशन आपल्या शरीरातील मोठ्या आतड्या (कोलन) मधून साचलेला मल पूर्णपणे काढून टाकते. त्यामुळे साहजिकच  बद्धकोष्ठता, अपेन्डिसाइटिस आणि


कोलन कॅन्सरच्या घटनांचा संभाव्य धोका कमी होतो.

स्क्वॅटिंगची स्थिती योगाभ्यासातील मलासानाच्या स्थितीसारखी असते. त्यामुळे पोटाचे स्नायू आपसूकच ताणले जातात, नितंब प्रसरण पावतात व गुदद्वार उघडते. मांडीपासून मानेच्या भागापर्यंतचा ताण कमी होतो, ज्यामुळे पाठीच्या कणाला आराम मिळतो. हि क्रिया श्रोणि क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि मूत्रमार्गात असंयम (गळती) प्रक्रिया नियंत्रित करते. ह्या स्थितीत स्वायत्त मज्जासंस्थेतील तणाव कमी करण्यासाठी मूलाधार चक्राचे पालनपोषण केले जाते, शिवाय वापरकर्त्यांना शांत मलनिस्सारण क्रिया व समाधानाची भावना देते.

सदर क्रियेने पायांचे स्नायू सुखावतात, पोटाचे स्नायू टोन होतात, पचनास मदत मिळते आणि चयापचय संस्था मजबूत होते.

नैसर्गिकरित्या हे आसन गुदाशय सरळ ठेवून गुदद्वाराचे स्नायू शिथिल ठेवते.

परिणामत: शौचालयाच्या पृष्ठभागाशी कमीत कमी संपर्क झाल्यामुळे भारतीय शौचालय वापरकर्त्यांना मूत्रमार्गात संक्रमण आणि त्वचा संक्रमणाचा संभाव्य धोका पाश्चात्य शैलीच्या तुलनेने कमी असतो.

पाश्चात्य शौचालयांच्या तुलनेत, भारतीय शौचालये गर्भाशयावर कमीत कमी दाब देतात आणि नैसर्गिकरित्या गर्भवती महिलेला सहज प्रसूतीसाठी तयार करतात.

ज्या कोणाला गुडघ्याला दुखापत, पाठीच्या खालच्या भागात दुखापत, शस्त्रक्रिया किंवा गर्भधारणेशी संबंधित गंभीर आजार असलेले असे रुग्णं वगळता भारतीय शौचालये सुरक्षित आणि फायदेशीर आहेत.

मानावाच्या उत्पत्ती पासून आतापर्यंत नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी नैसर्गिक आसन म्हणून भारतीय शैलीच्या संडास/लॅट्रिन/प्रसाधनगृहाची  सहज पद्धती लोकप्रिय आहे.

डॉ. स्वाती पद्माकर भावसार

4 comments:

  1. छान लेख आहे

    ReplyDelete
  2. महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती.

    ReplyDelete
  3. धन्यवाद

    ReplyDelete